दौंड, (पुणे) : Daund Crime: प्रेमप्रकरणानंतर युवतीने (Young woman) लग्न करण्याची मागणी केली. मात्र, प्रियकराने (young man) लग्नास नकार दिल्याने तरुणीने टेरेसवरून उडी (jumping from building) मारून आत्महत्या (suicide)केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. १२) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दौंड (Daund Crime News) येथे उघडकीस आली आहे.
तरुणावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
साक्षी मोरोपंत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ कौशल मोरोपंत गायकवाड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निखिल साबळे (रा-मोरेवस्ती ता. दौंड) या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड पोलिसांनी दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल यांची बहीण साक्षी मोरोपंत गायकवाड ही आनंद हाँस्पीटल दौंड येथे रक्त तपासणी विभागात काम करीत होती. शनिवारी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साक्षी ही थोड्या टेन्शन मध्ये दिसून आली. त्यांनी तिला विचारले की, काय झाले त्यावर तिने सांगितले की, निखिल साबळे याच्या सोबत ५ वर्षापासुन प्रेमसंबंध आहेत. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण तो माझ्या सोबत लग्न करण्यास नकार देत आहे. त्यामुळे माझी जगण्याची इच्छा राहीली नाही असे म्हणत होती.
साक्षीची समजुत काढली आणि ते रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता साक्षी ही घरामध्ये दिसली नाही. दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी टेरेसवरुन खाली पाहीले असता साक्षी ही रक्त बंबाळ अवस्थेत आढळून आली. साक्षीला उपचारासाठी दौंड येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान,आरोपी निखिल साबळे याने साक्षी हिच्यासोबत लग्न करण्यास नकार देवुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दौंड पोलिस करत आहेत.
Daund Crime : धक्कादायक ! पोलिस भरतीचे पूर्व ट्रेनींग घेणार्या तरुणीवर बलात्कार ; आरोपीला ठोकल्या बेड्या