Yawat News : यवत : यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने बार्शी येथे केलेल्या कारवाईत वाहने चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद केला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील वाहन चोर महादेव उर्फ आप्पा सलगर याने हा गुन्हा केला असून, याप्रकरणी दोन संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी हस्तगत करण्यात आली आहे. Yawat News
चोरीचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास बोरीपार्धी गावाच्या हद्दीतील केडगाव चौफुला ते सुपा रोडवरील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी नॅशनल गॅरेज येथे निलेश पांडुरंग लडकत (रा. लडकतवाडी) यांनी पार्क केलेली महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी (क्र. एम. एच. ४२ जी- ४३४४) चोरीचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. Yawat News
याबाबत यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता, पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील वाहन चोर महादेव उर्फ आप्पा सलगर याने केला असून, उंडेगाव (सोलापूर) येथून संशयित आरोपी महादेव उर्फ आप्पा नागेश सलगर (वय २१, रा. उंडेगाव पाण्याच्या टाकीजवळ, ता. बार्शी, जि. सोलापूर) व अस्लम जलेब खान (वय ४०, रा. खुशालपारख, जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरून नेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी महादेव उर्फ आप्पा सलगर याच्यावर भिगवण, जयसिंगपूर, मोहोळ, कुर्डुवाडी व बार्शी पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल आहेत. Yawat News
ही कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, राजू मोमीन, पोलीस नाईक विशाल जाधव, पोलीस शिपाई मारुती बाराते, भारत भोसले, सुनील कोळी यांच्या पथकाने केली. Yawat News