Yavat News : यवत, (पुणे) : पालखी सोहळ्यादरम्यान कासुर्डी टोलनाक्यावर चारचाकी वाहन अडवल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. (Yavat News )
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे नाव असून त्यांना गुरुवारी (ता. १५) रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार नितीन भानुदास कोहक यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Yavat News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कासुर्डी टोलनाका परिसरात पोलीस थांबले होते. त्यानुसार सदर ठिकाणी हवालदार नितीन कोहक व त्यांचे आणखी कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी पुण्याकडे जाणारी वाहतुक बंद करण्याचे काम करीत होते. यावेळी सदर ठिकाणी वंदना मोहिते यांनी वाह्तुकीवरून नितीन कोहक यांच्याशी हुज्जत घालुन त्यांच्या डाव्या गालावर चापट मारली. (Yavat News)
दरम्यान, पोलीस करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा निर्माण करुन जबरदस्तीने बॅरीकेटींग काढत तेथुन पुणे बाजुकडे निघुन गेल्या. याप्रकरणी डॉ. वंदना मोहिते यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे या करीत आहेत. (Yavat News)