Yavat News यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तात्याबा बाबुराव खराडे या वृद्धाला लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Yavat News)
तात्याबा खराडे हे नेहमीप्रमाणे यवत गावातील मंदिरात दर्शन घेऊन सेवा रस्त्याने परतत असताना यशोदा कलेक्शनचे समोर दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरून येत पोलीस असल्याचे सांगून ‘तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून तुमचे खिश्यात ठेवा’ असे म्हणाले. (Yavat News)
यावेळी तात्याबा खराडे यांनी घरी गेल्यावर अंगठ्या काढून ठेवतो, असे म्हटले असता त्यापैकी एका इसमाने खराडे यांचा उजवा हात ओढुन दोन तोळे वजनाच्या अंगठ्या जबरदस्तीने काढुन घेतल्या. त्यानंतर पल्सर मोटार सायकलवरून पुणेच्या दिशेने निघुन गेले. दुचाकीचालकाने हेल्मेट तर उभ्या रेषांचा फिकट निळ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पांढरे रंगाचा शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाची सॅक घेतलेली होती.
याबाबत तात्याबा खराडे यांनी यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, तात्याबा बाबुराव खराडे हे प्रसिद्ध व्यावसायिक संतोष खराडे यांचे वडील असून, सायकल विक्री दुकान व गुंजन सिनेमागृह चालवुन कुटुंबाची उपजिविका करतात.