Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : हॉटेलमध्ये किरकोळ धक्का लागण्याच्या कारणावरून तरुणाची खुर्चीने मारहाण करून हत्या ; उरुळी कांचन येथील दोघांसह तिघांना अटक

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 12 May 2026, 17:32

Yavat Crime News : यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 39 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीतील ओअसीस हॉटेलमध्ये सोमवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाच ते पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. Yavat Crime News 

धनराज शिवाजी भुरके (वय 39, रा. अंबुलगा मेन ता. निलंगा जि लातुर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर माऊली पांडुरंग जाधव, व विशाल मारुती धेंडे (रा. दोघेही उरुळी कांचन, ता. हवेली), नवाज रियाज तांबोळी (रा. यवत, ता. दौंड) असे खून करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी दयानंद विश्वनाथआप्पा भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. Yavat Crime News 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनराज भुरके हे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे चुलते दयानंद भुरके आणि मित्र अक्षय निगडे यांच्यासोबत सहजपूर फाटा येथील ओअसीस हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलच्या परमिट रूममध्ये जेवण करत असताना धनराज भुरके हे बाथरूमला जाण्यासाठी निघाले. यावेळी तिथेच शेजारच्या टेबलावर बसलेल्या व्यक्तींना त्यांचा नकळत धक्का लागला. Yavat Crime News 

धक्का लागल्याच्या रागातून समोरच्या टेबलावर बसलेल्या तिघांनी धनराज भुरके यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या तिघांनी धनराज यांना लाथाबुक्क्यांनी तसेच हॉटेलमधील खुर्चीने डोक्यावर व शरीरावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात धनराज भुरके हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. Yavat Crime News 

 

दरम्यान, याप्रकरणी दयानंद भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सापळा रचून वरील तिघांना ताब्यात घेतले. यवत पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली असून यवत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Yavat Crime News 

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अंतिम दर्शनाची आस अनेकांची अपूर्णच! नाना पाटेकरांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार का केले? मुलाने सांगितलं कारण

Friday, 9 October 2026, 8:28

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज पाऊस पडणार की ऊन तापवणार? पाहा, 9 ऑक्टोबरचा हवामानाचा अंदाज

Friday, 9 October 2026, 8:17

Daily Horoscope: आजचा दिवस ठरू शकतो निर्णायक! ‘या’ राशींना कामात यश अन् आर्थिक फायदा; तर काहींनी खर्च सांभाळावा

Friday, 9 October 2026, 7:50

इंदापूरात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाला काठी-लोखंडी पाइपने मारहाण

Thursday, 8 October 2026, 20:58

पूनावाला ग्रुपच्या खासगी गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Thursday, 8 October 2026, 20:29

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 19:07
Next Post

Meest Volatiele Sessie in Cash or Crash Live Ooit Meegemaakt door Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp