(Yavat Crime )उरुळी कांचन, (पुणे) : बेकायदा गर्दी जमवुन राजेष उर्फ गोट्या पवार याची गावामध्ये बदनामी केल्याच्या गैरसमजातून १० जणांनी एकजणाला लोखंडी रॉंड, दोन लाकडी दांडके, वीट, हाताने, व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना यवत येथे घडली आहे. बुधवारी (ता. २९) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास यवत ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ परिसरात घडली आहे.
याप्रकरणी बबन मारूती शिंदे, वय – ५२, धंदा शेळीपालन, रा. सहकारनगर, यवत, ता. दौड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी सुदेष कानडे (पुर्ण नाव माहित नाही), महेष मोहन पवार, नवाज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), परवेज तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही), भोंग्या यादव (पुर्ण नाव माहीत नाही), सर्व रा. यवत, ता. दौड, व त्यांचे अनोळखी आणखी ५ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार….!
बबन शिंदे हे बुधवारी (ता. २९) यवत ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ येथील पडक्यामठा जवळ दुचाकीवरून निघाले होते. यावेळी त्या ठिकाणी सुदेष कानडे, महेष मोहन पवार यांनी शिंदे यांची गाडी अडवली व त्या ठिकाणी उभे असलेले वरील इसम यांनी संगणमत करून बेकायदा गर्दी जमवुन राजेष उर्फ गोट्या पवार याची गावामध्ये बदनामी करतो काय असे म्हणून शिवीगाळ करण्यात सुरुवात केली.
याच गैरसमजुतीतून लोखंडी रॉंड, दोन लाकडी दांडके, वीट, हाताने, व लाथाबुक्क्यांनी गंभीर दुखापत करून शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्यानुसार शिंदे यांनी सदर वरील घडला प्रकार हा राजेष उर्फे गोठया मोहन पवार याचे सांगणे वरून केली असल्याचा संशय असल्याने वरील इस्मांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
तपासी अंमलदार पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.
दरम्यान, फिर्यादी व आरोपी हे दोघेही मटकाचालक आहेत. यवत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हि घटना घडली आहे. दोन्ही मटके वाल्याचे भर बाजार पेठेत रहदारीच्या ठिकाणी खुले आम मटका धंदे चालू आहेत. पोलीस मात्र तुटपुंजी कारवाई करीत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!