शिरूर : मैत्रिणींना इमारतीमध्ये येण्यास महिलेने मज्जाव केल्याने चिडलेल्या तरुणांने महिलेच्या स्कुटीसह घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरातील फकीर मोहल्ला परिसरात मंगळवारी (ता.३) बुधवारी (ता.४) घडली. या घटनेत महिलेची दुचाकी जाळून खाक झाली आहे. सुदैवाने पार्किंगममध्ये आग लागल्याने घराला कोणतेही नुकसान झाले नाही. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अजहर जमिर खान (रा- अजिम भाई चाळ, भाजी बाजार, शिरूर जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जुलेखा मलिक शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुलेखा शेख यांनी आरोपी अजहर खान याला म्हणाल्या की, तुझ्या मैत्रिणींना घेऊन बिल्डींग मध्ये येत जाऊ नको. माझ्या घरीपण मुली आहे. तुझ्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होईल.
दरम्यान, या गोष्टीचा राग आरोपीने मनात धरला होता. रागाच्या भरात त्याने फिर्यदीच्या पार्किंगमध्ये असलेली स्कूटी पेटवून दिली. पेटलेल्या स्कूटीबरोबर घराला देखील पेटवले. यात फिर्यदीची स्कूटी पूर्ण जाळून खाक झाली.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरी जावून तुम्ही पोलीसात तक्रार दिली तर एकेकाला जीवे मारतो, अशी धमकी दिली. असे फिर्यादीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरक्षक सुनील उगले करीत आहे.