पुणे / संतोष गायकवाड : पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावर घडली. कोमल अजय चव्हाण (रा. बालाजी पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती अजय दामोदर चव्हाण (रा. कुटेवस्ती, लोणीकंद-बकोरी रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोमलचे वडील नंदू गोपीनाथ शिर्के (वय ४८, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी अजय हा पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत होता. या सततच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार करत आहेत.