राहुलकुमार अवचट
यवत : येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या खुटबाब येथे पत्नीने पतीचा खून केला होता. पती – पत्नीचे पटत नसल्याने त्यांच्यात सातत्याने वादविवाद होत होते. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून व विळ्याने वार करून खून केला होता. या प्रकरणात आरोपी पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पत्नीने पतीचा खून केल्यानंतर याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन अधिकारी आर. के. गवळी यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. यावर आज न्यायालयाने निकाल देताना पत्नीला जन्मपेठ व ५००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात यावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी पोलीस नाईक वेणुनाद ढोपरे यांच्या सहकार्याने काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. ए. नलावडे यांनी तर सरकारी वकील म्हणून सुनील वसेकर याने काम पाहिले.