संभाजीनगर (औरंगाबाद) : गर्भपात करण्यासाठी पतीने गरजेपेक्षा जास्त गोळ्या खाऊ घातल्याने रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाली घटना संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे घेती असून या प्रकरणात मयत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार केली आहे.
शनिवारी (ता. २४) ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने पतीविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. दरम्यान महिलेला चौथे अपत्य होणार होते. चौथे अपत्य होऊ नयेत म्हणून पतीने पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. पण त्या किती खाव्यात याबाबत माहिती नसलेल्या पतीने पत्नीला आवश्यकतेपेक्षा जास्त गोळ्या खाऊ घातल्या.
एकाचवेळी जास्त गोळ्या खाल्याने महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला आणि प्रकृती बिघडली. त्यामुळे महिलेला उपचारासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल मात्र तेथून त्यांना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.