हनुमंत चिकणे
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar Womens Commission Chairperson ) राज्यात महिलांना न्याय मिळावा यासाठी फिरत असतांना, त्याच्यांच जिल्हात व त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या जिल्हा परीषदेत मात्र एका विधवा महिलेला संतापजणक व लज्जास्पद प्रकाराला सामोरी जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
दिवंगत पतीची पेन्शन मिळवुन देण्यासाठी, पुणे जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने संबधित विधवा महिलेकडे चक्क “किस” देण्याची मागणी केल्याचा लज्जास्पद प्रकार पुढे आला आहे. किसची मागणी करणारा जिल्हा परीषदेचा कर्मचारी मावळ तालुक्यातील असुन, संबधित महिलेच्या तक्रारीनंतर किस मागणाऱ्या निर्लज्ज कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदे सुत्रांच्या कडुन मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या दिवंगत पतीच्या पेन्शन घेण्यासाठी तक्रारदार विधवा महिला जिल्हा परीषदेच्या कार्यालयात वारंवार येत होती. आरोग्य विभागातील संबधित कर्चचाऱी बसत असलेल्या टेबलाजवळ वारंवार चकरा मारुनही, संबधित कर्मचारी मात्र वरील महिलेला प्रत्येक वेळी पुन्हा येण्याचे सांगत पेन्शन देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर चार दिवसापुर्वी संबधित महिलेने विनंती केल्यानंतर. आरोग्य विभागातील त्या कर्मचाऱ्याने या महिलेला “किस दे व पेन्शन घेऊ जा” असा संतापजणक व लज्जास्पद प्रस्ताव दिल्याचा आरोप संबधित महिलेने केला आहे.
दरम्यान, या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे याबद्दलची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच या कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत निलंबित देखील करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी विशाखा समितीकडे वर्ग करण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर कधी न्याय देणार..
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राज्यभरातील अत्याचाराग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी फिरत असतात. मात्र त्याच्यांच जिल्हाबरोबरच त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या जिल्हा परीषदेत मात्र एका विधवा महिलेला वरील प्रकाराला सामोरी जावे लागल्याने त्यांच्या पुढील भुमिकेकडे लक्ष लागुन राहिले आहे. रुपाली ताई चाकणकर यांनी वरील अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवुन द्यावा एवढीच अपेक्षा नागरीकांची आहे.