लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातुन घऱी परतणाऱ्या मुलींची छेडछाड काढणाऱ्या पाच ते सहा रोडरोमियोंना, मुलींच्या पालकांनी पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर जवळील थेऊर फाट्याजवळ पाठलाग करुन पळु-पळु मारले. छेडछाड करणारी मुले ही कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची व थेऊर परीसरातील असल्याचे समंजते आहे.
मुलींना छेडण्यासाठी रिक्षाचा पाठलाग करत असतांना, रिक्षातुन मुलींच्या ऐवजी मुलींचे “बाप” च उतरल्याने छेडछाडीसाठी गेलेल्या रोडरोमियोंना पळताभुई थोडी झाली. शेतातुन, पिकातुन दिसेल त्या रस्त्यांने रोडरोमियो पुढे व रोडरोमियोना पकडण्यासाठी पालक त्यांच्या पाठीमागे असे दृष्य आज (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजनेच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावरील थेऊर फाटा येथील शेकडो नागरीकांनी प्रत्यक्ष अनुभवले.
मानुस स्वभावाने अथवा पैशाने कितीही गरीब असला तरी, त्यांच्या मुलाबाळाकडे कोणी वाईट नजरेने पाहील्यास अथवा त्याच्या मुलाबाळाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास तो सरळमार्गी मानुस कसा “पिता” या हिंदी सिनेमातील संजय दत्तप्रमाने बदला घेतो ही हिंदी सिनेमातील गोष्ट थेऊर फाट्यावरील शेकडो नागरीकांनी प्रत्यक्ष याची डोळा याची- देही अनुभवली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत विध्यार्थ्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
लोणी काळभोर येथील एका नामांकित कनिष्ठ विद्यालयात थेऊरहुन ये-जा करणाऱ्या सहा मुलींना, त्यांच्याच विद्यालयातील तरुन मागिल कांही दिवसापासुन त्रास देत होते. मोटारसायकलवरुन पाठलाग करणे, विचीत्र हावभाव करणे, मुली प्रवास करत असलेल्या रिक्षाला मोटारसायकल आडवी मारुन मुलींनी आचकट-विचकट बोलणे हे प्रकार मागिल कांही दिवसापासुन मुली अनुभवत होत्या. सोमवारी (ता. 8) मुली विद्यालयात आल्या असता, त्याही दिवसी मुलींना वरील सहा रोडरोमियोच्या त्रासाला सोमोरी जावे लागले होते. वरील रोडरोमियोंचा त्रास वाढत चालल्याने, सहापैकी चार मुलीनी, रोडरोमियो करत असलेल्या छेडछाडीची माहिती पालकांना दिली होती.
दरम्यान बुधवारी विद्यालयाची वेळ संपल्यावर वरील सहापैकी चार मुली लोणी कॉर्नरवरुन रिक्षातुन थेऊरकडे निघाल्या होत्या. मुली रिक्षात बसताच, दोन मोटारसायकलवरुन पाच ते सहा जणांनी मुली बसलेल्या रिक्षाचा पाठलाग सुरु केला. मुली प्रवास करत असलेली रिक्षा थेऊर फाट्याजवळील एस4जी या हॉटेलजळ पोचताच, रोडरोमियोंनी दोनपैकी एक मोटारसायकल रिक्षाला आडवी मारुन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षात मुलींच्या बरोबर बसलेल्या मुलींच्या एका पालकांने मोटारसायकलला रिक्षातुनच लाथ मा्रुन मोटार सायकल वरील रोडरोमियोसह मोटार सायकलला खाली पाडले.
रिक्षातुन अचानक व अनपेक्षित हल्ला झाल्याने, खाली पडलेले दोघेही पळुन जाऊ लागले. त्याचवेळी रिक्षाच्या पाठीमागे असलेल्या मुलींच्या इतर पालकांनी रोडरोमियोंच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या पालकाकडुन हल्ला होत असल्याचे लक्षात येताच, मुलींना छेडण्यासाठी आलेले रोडरोमियों दिसेल त्या दिशेने पळत सुटले. पालकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र रोडरोमियो हाती लागु शकले नाहीत. पाच ते सहा तरुण पुढे पळतात, तर त्यांच्या पाठीमागे कांही पालक असा नजारा हॉटेलच्या आसपासच्या शेकडो नागरीक पहात होते.
याबाबत माहिती देतांना चारपैकी एका मुलीचे पालक म्हणाले, मागिल कांही दिवसापासुन मुलींना पाच ते सहा मुले त्रास देत होती. मात्र घरी सांगितल्यास, पालक शाळेत पाठवणार नाहीत या भितीने मुली गप्प राहिल्या होत्या. मात्र वरील मुलांनी सोमवारी मुलींना जादा त्रआस दिल्याने, मुलींना आम्हाला घडत असलेल्या प्रकाराची माहिती आम्हाला दिली होती. आज मुलींना घेण्यासाठी आलो होतो. मात्र वरील मुलांनी मोटार सायकल आडवी मारुन, आमची रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही मोटचार सायकलला लाथ मारुन त्यााला खाली पाडले. त्याला पकडुन पोलिसात देणार होतो., मात्र त्यापुर्वीच ते पळुन गेले. याबाबत रितसर पोलिसांना माहिती दिली आहे