संतोष गायकवाड
Wagholi News : वाघोली, (पुणे) : फोनद्वारे जॉबचे आमिष दाखवून इंटरव्यू घेऊन सिलेक्शन झाले आहे असे सांगत प्रोसेसिंगफी साठी १९ हजार रुपयांची रक्कम विविध बँक अकौंट मध्ये भरण्यास सांगून एका तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पेरणे फाटा येथील तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Wagholi News)
अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील एका तरुणाने कॉलेजमधून बीसीएचे शिक्षण पुर्ण केले आहे. तरुणाला फोन द्वारे जॉबचे आमिष दाखविण्यात आले. फोनवरच इंटरव्यू घेऊन तुमचे सिलेक्शन झाले आहे असे सांगण्यात आले. त्यासाठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगितल्याने विविध बँक अकौंटवर तरुणाने १९ हजार रुपये तरुणाने भरले.(Wagholi News)
दरम्यान, यानंतर फोन बंद झाल्याने तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीची आयसीजेएस पोर्टलवर तक्रार केल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Wagholi News)