मुंबई : व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य कर्ज वाटपाच्या आरोपप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली.
तसेच धूत यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे.
त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.