लोणी काळभोर, (पुणे) : तरुणीचे व्हिडिओ कॉलचे रेकॉडींग आणि अश्लिल छायाचित्रे इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेम संबंधातून लिव्हइनमध्ये राहत असताना वाद झाल्यानंतर तरुणाने हे कृत्य केले आहे. दोघांमध्ये झालेले हा प्रकार समजताच तरुणीने पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी विजय महादेव माने (वय-२६,रा.लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि आरोपींचे प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांशी इंस्टाग्राम आणि व्हॉटसअप कॉलवर बोलत होते. ते लिव्हइनमध्ये देखील राहत होते.
दरम्यान, या आरोपीने व्हिडीओ कॉल केल्यानंतर बोलताना गुपचूप त्याचे स्क्रीन व्हिडिओ आणि अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्याने हे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकून पिडीतेची बदनामी केली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.