अजित जगताप
वडूज : वडूज परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वावरणाऱ्या तोतया पोलिसाला वडूज पोलिसांनी शिताफीने सापळा रचून पकडले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
निलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली ता. कराड जि . सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे.
पोलीस अधिकारी असल्याचे सांगून सोन्याचे दागिने व रक्कम लांबविल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. २१ फेब्रुवारी रोजी कांदा – बटाटा व्यापारी प्रकाश बनकर यांचे साडे दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले होते. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती. यादरम्यान वडूज पोलिसांनी वडूज-कराड रोड लगत असणाऱ्या एका हॉटेल नजीक तोतया पोलीस सापळा लावून पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २२) रोजी वडूज कराड या रस्त्यावर एक पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करत असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पडताळणी करण्याचे ठरवून ते वडूज कराड रस्त्यावर पोचले. यावेळी त्यांनी आपली वाहने आलीकडेचं थांबविली. व चालत पोलीस अधिकार्याच्या जवळ पोचले. यावेळी वाहनांची तपासणी करणारा अधिकारी त्याची मोटार सायकल (एम एच११ ए सी ५४२६) उभी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशारा करत होता.
पडताळणी करत असलेल्या पोलिसांनी वाहनांची तपासणी करणाऱ्या अधिकारायचे नाव विचारले असता त्याने एपीआय विशाल संजय पाटील असे नाव सांगितले. मात्र, त्याचवेळी बाकी लोकांनी नेमणूक कोठे आहे, असे विचारले असता तो मात्र, चाचपडला. आणि पाळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र खर्या पोलिसांनी त्याला पकडले.
याबाबत पोलीस हवालदार बापू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस ना. अश्विनी काळभोर करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, पो .ना. दीपक देवकर, पो.कॉ .संदीप शेडगे, सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.