Vadaki News लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील तरुणीचा विनयभंग करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील रविदर्शन येथे शनिवारी (ता.२२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. (Vadaki News)
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आजिम आयुब मुलाणी (वय अंदाजे २३, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ वडकी, सासवड रोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही हडपसर परिसरात काम करते. फिर्यादी या त्यांच्या मामीचा भाऊ नामे राज पोतदार यांच्या गाडीवरून कामाला चालल्या होती. त्या दुचाकीवरून रविदर्शन येथे आल्या . तेव्हा आरोपी आजिम मुलाणी हा तेथे कार घेऊन आला, त्याने राज पोतदार याचा हात धरून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला.
तेव्हा तरुणी आजिम यास म्हणाल्या की, त्यास काही करू नकोस, तेव्हा आरोपीने राज यास सोडले व पटकन तरुणीच्या हाताला धरून जोरात हिसका मारून जोरजोरात शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने तरुणीला यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अमनोरा मॉल (हडपसर) या ठिकाणी घेवून गेला. व तिचा जोरात गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली.
दरम्यान, फिर्यादी तरुणीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जोरात आरडाओरडा केला व त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. तसेच यापुर्वीही अजिम याने फिर्यादी यांच्या आईला व भावाला दमदाटी केली होती.
याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप करीत आहेत.