Uruli Kanchan उरुळी कांचन, (पुणे) : अवैधरीत्या कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून गोवंश संरक्षण दलाच्या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ४ जनावरांची सुटका केली आहे. तर जनावरे घेऊन निघालेल्या तरुणावार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून पोलिसांनी ५५ हजार रुपये किमतीची ४ जनावरे व ४ लाख ४५ हजार रुपयांचा टेम्पो असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अक्षय राजेंद्र कांचन (वय -२५ रा. महादेव नगर, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी असीफ पैगंबर सय्यद (वय-२० धंदा- मजुरी, रा. स.नं. १३१, शिंदेवस्ती, गुरुदेव मित्रमंडळाच्या बाजुला, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
अक्षय कांचन हे शेती व्यवसाय करीत असून गोरक्षादल महाराष्ट्र राज्य या गोवंश संरक्षण दला मार्फतीने गोरक्षक म्हणुन काम करतात. बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास असीफ पैगंबर सय्यद हा त्याच्या वाहनातून गोवंश जातीचे जनावरांना राहु (ता. दौड) येथून बेकायदेशीरपणे भरून त्यांस कोढवा पुणे या ठिकाणी मलंग मेहबुब कुरेशी रा. बाबा जान मस्जीद जवळ, कोढवा, पुणे या ठिकाणी जनावरांचे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार…!
कांचन यांचे सहकारी गोरक्षक ऋषीकेश कामठे, अनिरुद्ध लष्करे, राहुल कदम, तेजस कड, रविद्र पडवळ अष्टापुर मार्गे केसनंद गावाच्या हद्दीत एक वाहन रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाघोली गांवकडे निघाले असल्याचे त्यांना दिसून आले. सदर वाहन थांबवून मिळालेल्या माहितीची खात्री केली यावेळी वाहनाच्या हौद याची ताडपत्री उघडुन आत पाहीले असता त्यामध्ये २ गायी व २ बैल असे गोवंश जनावरे दाटीवाटीने कोचल्याचे दिसून आले. सदरची माहिती लोणीकंद पोलीस ठाणे अंकित केसनंद पोलीस चौकी येथे माहीती अनिरुद्ध लष्करे दिली.
केसनंद चौकी येथे पोलिसांनी संशयित वाहनाची झडती घेऊन संशयित इसमांकडे चौकशी केली असता त्याने त्याचे वरीलप्रमाणे सांगितले. त्यावेळी त्यांचेकडे टेम्पोतील ०२ गायी व ०२ बैल यांच्या खरेदीच्या व वाहतुकीच्या परवान्याच्या कागदपत्र मागितले असता त्याने नमुद जनावरांचे खरेदी व वाहतुकीचे परवाना कागदपत्र, वैदकीय प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले.
दरम्यान, सदरची जनावरे कोठे घेऊन जात आहे याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. सदर जनावरांना टेम्पोच्या मागील हौदयामध्ये चारा- पाणी, इ.ची सोय दिसुन आली नाही. दोरीने जखडून अत्यंत निर्दयपणे, बेकायदेशीरपणे कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना मिळुन आला म्हणुन अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणीकंद पोलिसांनी ५ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला आहे.