Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : कोयत्याचा धाक दाखवून आई – वडिलांना जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी मागिल पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Uruli Kanchan News)
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता. १२) संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आहे. मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख (मुजावर) व आयुब शेख (मुजावर), (रा. दोघेही, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) या नराधमांविरूद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे. (Uruli Kanchan News)
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई हि उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात कुटुंबासहित राहतात. मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी मुलीची आई या बाहेर आल्या होत्या. यावेळी मुलगी अभ्यास करीत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब मुजावर हा दिसून आला. यावेळी पिडीतेच्या आईला आयुब मुजावर याने पहिले असता पळून गेला. मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता यावेळी खोलीत इरफान मुजावर हा खोलीत दिसून आला. मुलीच्या आईला पाहून तो तेथून पळून गेला. (Uruli Kanchan News)
मुलीच्या आईने मुलीकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले कि, आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागिल पंधरा दिवसांपासून तिच्यावर दोघेजण बलात्कार करत होते. मात्र दोघांकडून आई वडिलांच्या जिवाला भिती असल्याने, मागिल पंधरा दिवसांपासून दोघांचे अत्याचार निपुटपणे झेलत होती. मंगळवारी संध्याकाळी तिच्याशी आळीपाळीने बळजबरीने शरीर संबंध करण्यासाठी आले असल्याची माहिती पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितले. यावरून पिडीत मुलीच्या आईने इरफान शेख व आयुब शेख याचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कायदेशिर तक्रार दिली आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र त्यात उल्लेख केला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख व आयुब शेख या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे याच दोन आरोपींनी काही दिवसांपूर्वी महापुरुषांच्या अवमानप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनच्या वतीने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. (Uruli Kanchan News)