Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचनमध्ये पतीने पत्नीच्या गुप्तांगावर टाकले ॲसिड’ ; नराधम पतीविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 17 May 2026, 10:53

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : चारित्र्याचा संशय घेऊन आणि “तुला दोन मुलीच आहेत, मुलगा होत नाही,” या कारणावरून एका नराधम पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक व संतापजनक घटना घडली आहे. Uruli Kanchan

उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीत 20 एप्रिल 2026 रोजी हि घटना घडली. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी न घेऊन जाता 15 दिवस घरात कोंडून ठेवल्याचेही उघडकीस आले असून याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. 15) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिलला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती हे दारू पिऊन घरी आले. “तू कामावर जातेस, तुझे कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,” असे म्हणत त्यांनी पत्नीला मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असताना नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही, तर “तुला मुलगा होत नाही, तुझी अवघड जागाच जाळून टाकतो,” अशी धमकी त्याने दिली. Uruli Kanchan

 

त्यानंतर पोटमाळ्यावरून टॉयलेट साफ करण्याची ॲसिडची बाटली काढून त्याने पत्नी यांना जोरात खाली ढकलले आणि त्यांच्या गुप्तांगावर थेट ॲसिड ओतले. पीडितेने जीवाच्या आकांताने ओरडत बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने दरवाजा आतून लावून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेजारी राहणाऱ्या जावेने पीडितेच्या सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले, तेव्हा “कोणाला काही सांगितले तर जिवे मारीन,” अशी धमकी देत पती घरातून पळून गेला. Uruli Kanchan

अतिशय गंभीर अवस्थेत असतानाही नराधम पतीने “माझ्याकडे पैसे नाहीत,” असे म्हणून फिर्यादी यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला आणि 15 दिवस माहेरी किंवा कुठेही जाऊ न देता घरातच डांबून ठेवले. अखेर शनिवारी (ता. 09 मे) रोजी पती कामावर गेल्यानंतर फिर्यादी यांनी दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि आपले माहेर गाठले. माहेरी सर्व प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. Uruli Kanchan

दरम्यान, पोलिसांनी तातडीने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवले, जिथे उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उरुळी कांचन पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून नराधम पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम कलम १२४(१), कलम ११५(२), ३५१(२) व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Uruli Kanchan

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Navegar en betonwin sorprende por su interfaz sencilla y sin complicaciones

Thursday, 9 July 2026, 19:26

Test Post Created

Thursday, 9 July 2026, 19:26

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? कर्जमाफीसाठी ‘पूल खाते’ प्रणाली लागू; सरकारची मोठी हालचाल

Thursday, 9 July 2026, 19:07

Eenvoudig navigeren tussen casino buitenland online zonder gedoe

Thursday, 9 July 2026, 18:41

कुंजीरवाडीतील ऑनलाइन ‘कल्याण मटक्याच्या’ अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा, दोघांवर गुन्हा तर 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 9 July 2026, 18:40

Test Post Created

Thursday, 9 July 2026, 18:40
Next Post

Bhor News : नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट ; आरोपीविरोधात 1100 पानी चार्जशीट दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.