Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट ; आरोपीविरोधात 1100 पानी चार्जशीट दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंद

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 11:09

Bhor News  पुणे, ता. 17 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत न्यायालयात तब्बल ११०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणी अहवाल, वैद्यकीय तसेच न्यायवैद्यकीय पुरावे जोडण्यात आले आहेत. Bhor News

या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिस अधीक्षकांसह सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करून अल्पावधीत तपास पूर्ण केला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मीसार हे सरकार पक्षाची बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. Bhor News

 

राज्यभर संतापाची लाट
नसरापूर येथे घडलेल्या या अमानुष घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन आणि मोर्चे काढले होते. “आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,” अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल रात्री उशिरा न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. Bhor News

नेमकं काय घडलं होतं?
१ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला होता. दुपारी मुलगी दिसेनाशी झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आणि या भीषण घटनेचा उलगडा झाला. Bhor News

न्यायालयातही धक्कादायक वर्तन
या प्रकरणात ग्रामस्थांनी संतप्त होत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र इतके गंभीर कृत्य करूनही आरोपीने पश्चाताप व्यक्त न केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी “तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे, माहिती आहे का?” असा प्रश्न विचारला असता, आरोपीने “ही मारामारीची किरकोळ केस आहे,” असे उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. या उत्तरामुळे न्यायालय परिसरातही संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. Bhor News

यापूर्वीही गंभीर आरोप
तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुराव्याअभावी तो दोन वेळा निर्दोष सुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात तरी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post

Airtel Network : यवत येथे तब्बल १२ तास एअरटेल नेटवर्क ठप्प ; ग्राहकांची दिवसभर प्रचंड गैरसोय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.