सुरेश घाडगे
परंडा : परंडा शहरातील ऋषीकेश मिशनरी स्टोअर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडे तीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
याप्रकरणी दुकानाचे मालक नितीन माधव जाधव यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन जाधव यांचे परंडा शहरातील जुनी भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी ऋषीकेश मिशनरी स्टोअर्स या नावाने मशीनरीचे दुकान आहे. जाधव यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.२२) संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले.
शुक्रवारी (ता. २३) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरच्या लॉक पट्टया तोडून दुकानातील तांब्याची केबल, तांब्याची तार, बेरींग, मोठी बेअरींग, फ्यूज. एचपी मोटार. एलटी पट्टी किट व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४८ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
दरम्यान, चोरट्याने रेखीपुर्ण नियोजनबद्ध चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या प्रकरणी जाधव यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कवीता मुसळे करीत आहेत.