पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. तसेच लग्नास नकार दिलातर आत्महत्या करण्याची धमकी देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात करण्यात आली आहे.
हा प्रकार फेब्रुवारी 2024 पासून 7 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलीच्या घराजवळ घडला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने रविवारी १० मार्च रोजी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार रवि शिंदे
(वय-20 रा. मानाजीनगर, वडगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला. तसेच मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु मला हो म्हण, नाहीतर मी फाशी घेईन, असं म्हणून मुलीवर दबाव टाकून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.