परंडा : उमरग्याचे तहसीलदार राहुल पाटील यांना २० हजाराची लाच स्विकारताना एसीबीने बुधवारी (ता.२४) रंगेहाथ पकडले आहे.राहुल मधुकर पाटील (वय-४८,) पद :- तहसीलदार, उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद,वर्ग-१) असे पकडण्यात आलेल्या तहसिलदाराचे नाव आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे होते. त्यासाठी चार ट्रक वाळूची आवश्यकता होती. तक्रारदार हे तहसीलदार राहुल पाटील यांची भेट घेण्यासाठी शासकीय निवासस्थानी गेले. तेव्हा तहसीलदार राहुल पाटील यांन मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी एका ट्रकला ५ हजार रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी २० हजार लाचेची मागणी केली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार राहुल पाटील यांच्या शासकीय निवास्थानी सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून २० हजार लाच स्विकारताना तहसीलदार राहुल पाटील यांना रंगेहाथ पकडले.
हि कारवाई उस्मानाबादचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, विशाल डोके आणि जाकेर काझी यांच्या पथकाने केली आहे.