सोलापूर : मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरीत्या गौण खनीज उत्खनन सुरु आहे. त्याच्यावर कारवाई का केली जात नाही म्हणून सोशल मिडीयावर बदनामी करून तुमच्या विरोधात आंदोलन करेल अशी धमकी देत मोहोळचे तहसीलदार यांना ५० हजाराची खंडणी मागून त्या पैकी आठ हजार रुपये रोख रक्कम कार्यालयातच स्विकारताना प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोहोळ तालुका प्रहार संघटनेचा तालुकाध्यक्ष वैभव जावळे (रा. शिरापूर ता. मोहोळ), व शहराध्यक्ष अजित कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर खंडणी व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाआहे. याप्रकरणी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील अवैध्यरीत्या गौण खनीजाची रॉयल्टी महसुल बुडवून तसेच चिचोली-काटी औध्योगीक वसहातील बालाजी अमाईन्स कंपनीने बेकायदा शासनाचा महसुल बुडवुन गौण खनीज नेली जाते. त्याच्यावर कारवाई का करीत नाही असा जाब तहसीलदार यांना विचारला तेव्हा तहसीलदार यांनी तुम्हाला जी माहीती हवी आहे ती माहीती माहीतीच्या अधिकारात मागुन घ्या असे सांगीतले.
यावेळी प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकणी यांना फोन करून तहसीलदार याना ५० हजार रू जावळे जवळ द्या असे म्हटले. पैसे न दिल्याने गेल्या दोन महीन्यापासुन विविध न्युज पोर्टलवर बदनामीच्या बातम्या देत होते.
सातत्याने पैशाची मागणी करीत व महसुल कार्यालयाची बदनामी करीत शासकीय कामात सारखाच अडथळा निर्माण करीत होता. तहसीलदार यांना व्हॉटसप वर मेसेज देखील केला होता.
वारंवार कार्यालयात येऊन पैशाची मागणी करत होते. त्याला वैतागुन शुक्रवारी (ता. २३) सकाळी १० वा वैभव जावळे याने पुन्हा पैशाची मागणी केली. सकाळी १०.३० वा तहसील कार्यालय येथे जावळे पुन्हा आला. वारंवार शासकीय कामात अडथळा आणुन कार्यालयाची सोशल मिडीयावर बदनामी झाल्यामुळे वैतागलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे यानी पोलीसांना ही माहीती दिली व आणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास सांगीतले.
दरम्यान, सायंकाळी ५ च्या दरम्यान आला व ३० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे दुसऱ्या कोणाकडे तरी द्या असे म्हणाला. तेव्हा कार्यालयातील लिपीक अडगळे यांच्या जवळ ८ हजार रुपये दिले आहेत ते घे म्हणाल्यावर तो पलीकडे कार्यालयात गेला तेथे २०० रु च्या ४० नोटा स्विकारताना अध्यक्ष वैभव जावळे याला साध्या वेषातील पोलीसांनी पकडले. पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून रात्री ११ वाजता वैभव जावळे याला अटक केली. शनिवार ता २४ रोजी मोहोळच्या न्यायालया समोर उभे करण्यात आले तेव्हा सोमवार पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.