अहमदनगर : Ahmednagar News : शेतीच्या पाण्याची सोय म्हणून आठच दिवसापूर्वी (built eight days ago)घरासमोर बांधलेल्या शेततळ्यात (falling in the farm) पडून चिमुकल्या सख्ख्या दोन भावांचा मृत्यू (Two children died) झाल्याची घटना घडली. श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे रविवारी (ता. १२) ही घटना घडली आहे. (Ahmednagar News )
Two children died after falling in the farm built eight days ago
आर्यन बंडोपंत साळुंखे (वय ९) व अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय८) अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीव्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे राहतात. सर्वत्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. रविवार व त्यातच रंगपंचमी असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले घरीच होती. तर त्यांचे आई- वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची मुले घरीच खेळत होती.
साळुंखे यांनी घरासमोरच शेतीच्या पाण्याची सोय म्हणून शेततळे केले आहे. आठ दिवसांपूर्वीच्या त्यांच्या घरासमोर शेततळे करण्यात आले आहे. उत्सुकतेपोटी ते तेथे खेळायला गेले आणि तळ्यात पडले.
दरम्यान, काही वेळात परिसरातीस लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातील युवकांनी तळ्यात उतरून त्या दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती त्यांच्या आई-वडिलांना देण्यात आली. आपल्या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला होता.