पुणे : सोशल मिडियाच्या माध्यमातून मेफेड्रॉन व चरस असे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तरूणांना सिंहगड रोड पोलिसांनी शनिवारी (ता.१९) अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश मंदिरा समोरील सार्वजनिक रोडवर आकाश महेंद्र ठाकर (वय २२ , रा. सनसिटी, आनंदनगर हिंगणे) आणि अनिकेत जनार्दन धांडेकर (वय-२०, रा. आनंद विहार कॉलनी नं. १ पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात ब्रम्हा हॉटेल चौकातुन रामनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना अखिल ओमकार मित्र मंडळ गणेश मंदिरा समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी आकाश ठाकर व अनिकेत धांडेकर हे मेफेड्रॉन व चरस असे अंमली पदार्थांची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपींची अंगझडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्याकडून सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचे मेफेड्रॉन व चरस असे अंमली पदार्थ मुद्देमाल जप्त केले आहे. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे – १ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, सचिन माळवे संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने केली आहे.