पुणे : शहरातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीस्वारा धडक दिल्याने दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी (दि.6) घडली. दरम्यान होळी सणाच्या दिवसी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेंद्र जगन्नाथ देसाई (वय 57 रा. स्वारगेट पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून गुंजन चौकाकडून नगर रस्त्याकडे जाणारी गुंजन चौकाकडून नगर रस्त्याकडे जाणारी ट्रॅव्हल बस क्रमांक (MH 14HG3969) हिने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चालक बसच्या चाकाखाली आला त्यामध्येच त्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या भीषण अपघातामुळे शास्त्रीनगर चौकात वाहतूककोंडी झाली होती. येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास येरवडा पोली करत आहेत.