पुणे : ग्राहक वाढविण्यासाठी एका हॉटेलचालकाने जेवणावर मोफत सूप देण्याची योजना केल्याने दुसर्या हॉटेलचालकांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकीतून समोर आला आहे. ही घटना खडकीमधील चौपाटी येथील मेवाड पावभाजी सेंटरसमोर सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याप्रकणी दोन जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ भालेराव आणि दिग्वीजय गजरे (रा. खडकी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. मुलायम रामकृपाल पाल (वय. २७, रा. खडकी) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाल यांचे ओ शेट नावाचे हॉटेल आहे. तर आरोपींचे साहेब नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी यांनी त्यांचे ग्राहक वाढावे, यासाठी जेवणाअगोदर मोफत सूप देण्याची योजना चालू केली. त्यामुळे फिर्यादी यांचे ग्राहक वाढले. त्याचा राग मनात धरुन आरोपी चौपाटी येथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जखमी केले. त्यानंतर मुलायम पाल यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.