अजित जगताप
वडूज : “जो ना करे ललाटी ते करून दाखवतो तलाठी” ही जुनी म्हण असले तरी अलीकडच्या काळात सध्या काही भागातील मंडलधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढचे पाऊल टाकून मनमानी कारभार करत आहे. हे खटाव तालुक्यात सिद्ध झाले असून त्यांच्या हस्तदोषाने खटाव तहसीलदारांना एका प्रकरणात खुलासा करण्याचे नामुष्की आली आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा अंबवडे येथील विलास नाना बरकडे यांनी दिल्यामुळे खळबळ माजली आहे.
खटाव तालुक्यातील मौजे अंबवडे येथील वाण्याची वाडी मळा नावाच्या शिवारात मिळकत क्रमांक ३८६ या मिळकतीच्या फेरफार क्रमांक ८४४ असून मिळकत त्याची वाटणी रोजी दि ६ जुलै १९८६ साली झाली होती. गट नंबर १०५८/२एसपारा शिवारातील असून त्याचा फेरफार क्रमांक ४६६४ असा आहे. त्याची नोंद नामंजूर केली आहे.
विलास नाना बरकडे यांच्या चुलत्याच्या नावावरून वारसांने एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद विलास नाना बरकडे यांचे नाव हस्तदोषाने नोंद करण्यात आली होती. सदरची नोंद पाहून त्या ठिकाणचे असलेल्या वारसदारांना आश्चर्याचा धक्का बसला.
याबाबत त्यांनी अनेकदा अंबवडे मंडलाधिकारी यांना विचारणा केले असता त्यांना असंच असणार मी करणार तेच खरं असं उलट उत्तर दिल्याचा आरोप संतोष विलास बरकडे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी खटावचे तहसीलदार यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना भेटून दिलं नाही. अखेर मोठ्या हिम्मतीने ही बाब खटाव तहसीलदारांच्या निदर्शनाने आणून दिली. त्यावेळेला सदरची बाब पुढे आल्यानंतर खटाव तहसीलदार यांनी लेखी स्वरुपात तसा आदेश करून ही जी चूक झालेली आहे.
तो दुरुस्त करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी आदेश क्रमांक तहसील कार्यालय खटाव क्र.आरटी एस/कावि/१९४२/२२ वडूज दि २२/८/२०२२ नुसार आदेश काढला होता त्या आदेशाप्रमाणे एकत्र कुटुंब मॅनेजर कमी करणे पत्र दिले होते.
सदरचे पत्र तलाठ्याला प्राप्त झाले परंतु, मंडलाधिकारी यांनी धनसेची दखल घेतली. त्यामुळे अद्यापही या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे विलास बरकडे यांनी प्रजासत्ताक दिनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चूक कुणाची व दोष कोणाला अशा पद्धतीने एका गरीब शेतकरी कुटुंबाला उध्वस्त करण्याचे काम निमसोड मंडलाधिकारी करत आहेत. अशी धारणा त्या शेतकऱ्यांची झाली आहे.
या प्रकरणांमध्ये जर मंडलाधिकारी दोषी आढळल्यास त्यांना कायदेशीर कारवाई करावी तसेच विभागीय चौकशी करावी. एका गरीब कुटुंबाला एक वर्ष झालं न्याय मिळाला नाही. ही बाब गंभीर असून याबाबत राज्याच्या उन्हाळी विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते यांना भेटून आवाज उठवण्याचा निर्णय संतोष बरकडे यांनी घेतलेला आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे खटाव तालुक्यात खळबळ माजली असून सत्य परिस्थिती लक्षात येण्यासाठी निमसोड येथील संबधित मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सदरच्या प्रकरणाबाबत सातारचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी खटाव-माण, तहसिलदार खटाव यांना माहितीसाठी प्रत पाठवली आहे. अशी माहिती अंबवडे ता खटाव येथील अन्यायग्रस्त शेतकरी संतोष बरकडे, विलास नाना बरकडे यांनी प्रसार माध्यमांकडे दिली आहे.