पुणे : वाघोली परिसरातील सोलासीय सोसायटीच्या चेंबरची स्वच्छता करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
नितीन प्रभाकर मोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५वर्ष) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील मोझे कॉलेज रस्त्याजवळील सोलासीय सोसायटीच्या चेंबरची स्वच्छता वरील तिघे काम करीत होते. चेंबर साफ करताना, बराच वेळ झाला तरी तिघांपैकी वरती कोणच आले नाही. कामगारांना आवाज तरीही आतून कोणताही प्रतिसाद आला नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दलाचे विजय महाजन, अक्षय बागल, मयूर गोसावी, चेतन समझे, तेजस सागरे, नितीन माने, संदीप शेळके, अभिजीत दराडे आणि विकास पालवे यांच्या पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वरील दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर एकाचा शोध अद्याप सुरूच आहे