Khed Crime राजगुरूनगर, (पुणे) : पोलीस पाटलाने शाळकरी मुलींना चाॅकलेटच्या अमिष दाखवून (school girls by luring them with chocolates) त्यांच्याबरोबर अश्लील चाळे (sexual intercourse) केल्याप्रकरणी वांजळे (ता. खेड ) (Wanjale) येथील आरोपी पोलीस पाटलाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (Rajgurunagar Additional District and Sessions Court) न्यायाधीश एस.एम. राजूरकर (Judge S.M. Rajurkar) यांनी मंगळवारी (ता. ०२) ही शिक्षा सुनावली. (Khed Crime)
गंगाराम नामदेव खंडे (वय ५९) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी अशी की, खेड तालुक्यातील वांजळे येथील तीन शालेय मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून गावच्या पोलिस पाटलाने अश्लील वर्तन केले होते. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिस पाटील गंगाराम खंडे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इयत्ता पाचवीत शिकत असणाऱ्या गावातील दाेन मुली व सहावीत शिकणारी एक मुलगी अशा तीन मुलींना दुपारी राहत्या घरात चॉकलेटचे आमिष दाखवून बोलावून घेतले. दरवाजाला आतून कडी लावून पप्पी घेत तिघींच्या अंगावरून हात फिरवून अश्लील चाळे केले.
दरम्यान, ही घटना मुलींनी घरी येऊन कुटुंबीयांना सांगितली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी येरवडा कारागृहात होता. राजगुरूनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यावर निकाल देण्यात आला. सरकारी वकील ॲड. पी.एस. आगरवाल यांनी फिर्यादी मुलींच्या बाजूने युक्तिवाद केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Khed News : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा ६ वर्षीय मुलीवर हल्ला ; आंबेगाव परिसरातील घटना..!
Khed Crime : तू मला इग्नोर का करतेस अशी विचारणा करत महिलेला मारहाण ; खेड तालुक्यातील घटना