पुणे – दारू पिण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच कोथरुड भागातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ऋषिकेश भास्कर यशोदे (वय ४३, रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तिघेजण कोथरुडमधील भुसारी कॉलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ दारू पित बसले होते. त्यवेळी यशोदे यांनी सोसायटीच्या आवारात दारू पिऊ नका, असे तिघांना सांगितले. त्यानंतर तिघांनीही यशोदे यांना उडवा उडवीची उतरे दिली. आणि आम्हाला ओळखले नाही का?, आम्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहोत असे सागितले. आणि त्यानंतर तिघांनी यशोदे यांना पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.