पुणे : बॉलिवूड अभिनेते व क्रिकेटपटूंचे ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून पुण्यातील फिनटेक स्टार्टअप कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुनीत, मोहम्मद आसिफ, सुनील कुमार, पंकज मिश्रा आणि विश्व भास्कर शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सायबर गुन्हेगारांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाशमी आणि महेंद्र सिंग धोनी यांचे नाव आणि पॅन कार्ड वापरु क्रेडिट कार्ड बनवून फसवणूक केली आहे. पुण्यातील फिनटेक स्टार्टअप कंपनीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप ‘वन कार्ड’कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली.
बनावट क्रेडिट कार्ड वापरनू आरोपींनी २१.३२ लाख रुपयांची खरेदी केली होती. क्रेडिट कार्ड कंपनीला फसवणूक झाल्याचे नंतर कळले. त्यानंतर कंपनीने तात्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी कारवाई करत याप्रकरणी पाच जणांना अटक केली.