पुणे : संक्रातीनिमित्त देवदर्शन करून निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील सव्वातीन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना पाषाण भागात घडली आहे. याप्रकणी एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला पाषाण-सूस रस्त्यावर राहायला आहे. संक्रातीनिमित्त रविवारी (ता. १५) रोजी महिला महिला आणि त्यांची जाऊ पाषाण परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यानंतर दर्शन घेऊन घर येत असताना, एका दुचाकीस्वार चोरट्याने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सव्वातीन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
यानंतर महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच लिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.