सुरेश घाडगे
परंडा : सोनारी परिसरात तांब्यांच्या तारा चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट घातला आहे. चोरट्यांनी हारणवडयातील तब्बल ७० कृषी पंपाच्या तारांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शेतकऱ्यांनी अभी पोलिसांकडे मागणी केली आहे.
सोनारी येथील हरणवडा येथे सिना कोळेगाव प्रकल्प पाण्याचा फुगवटा आहे . या हरणवड्यातील पात्रातील पाण्यात या परिसरातील भोंजा , कुंभेजा, खानापूर येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाईपलाईन करुन पाणी नेले आहे. या ठिकाणी शेकडो कृषी पंप आहेत. मोहन नलवडे यांच्या शेतातील हारणवडा येथील पॉईंटवरील जवळपास ७० कृषी पंपाची तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी ( दि. २० ) रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या आहेत.
दरम्यान, या वायरची प्रती फुट १०० रुपये किंमत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची २०० फुट वायर अशी ७० पंपाची १४ हजार फुट वायर चोरी गेली आह . अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी अभी ( ता.भूम) पोलीसांनी दिली. अभी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पंचनामा केला आहे. वायर चोरट्यांचा तपास लावून चोरटयांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा परंडा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल .असे शेतकऱ्यांनी अंभी पोलीसांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे.