(Theur Crime) पुणे : आधीच अवकाळी पावसाने हैराण असलेल्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या पाचटाला अज्ञाताने आग लावल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर येथील थेऊर गावातून समोर आली आहे. या आगीत ऊसाला पाणी देण्यासाठी असलेले ठिबकचे पाईप जळाले असून, शेतकऱ्याचे तब्बल दीड लाखांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संभाजीराव कुंजीर (वय ७३) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची जाधव वस्ती येथे शेती आहे. त्यांनी ऊसाची लागवड केली होती. त्याला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले होते. ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतात पाचट होते. दरम्यान त्यांच्याकडून शेतीतील कामकाज सुरू असतानाच मध्यरात्री अज्ञाताने या पाचटाला आग लावली.
आगीत पाचट तसेच दिड लाखांचे ठिबक सिंचनचे पाईप देखील जळून खाक झाले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांकडून आग लावण्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : ओपन जीममध्ये वीजेच्या धक्क्याने २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू!