दिनेश सोनवणे
दौंड : खोरवडी (ता. दौंड) येथील जगदाळे मळा, येथील डीपी मधून २२० किलो च्या तांब्याच्या वायरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या तांब्याच्या तारांची रक्कम एकूण ६६ हजार रुपये एवढी आहे. रोहित डीपी पैकी एकूण तीन रोहित्र डीपी मधील ऑइल काढून तांब्याच्या वायर देखील चोरी करण्यात आले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार धनाजी मराडे (वय २४ व्यवसाय वायरमन रा.खोरवडी ता. दौंड जि. पुणे) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच दौंड पोलिसांनी भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 अंतर्गत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संतोष शिंदे हे करीत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कॉपर केबल, चोरी व डीपी मधील केबल चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. या चोरट्यांचा वेळीच पकडणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिक करत आहे.