पुणे : शहरात चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. अशातच शहरातील लष्कर भागातील प्रसिद्ध असलेल्या जॉर्ज हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 93 हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मध्यरात्री ही चोरीची घटना घडली आहे.
याप्रकरणी जॉर्ज हॉटेलचे मालक जवहार इस्माइल जवादी (वय 62, रा. परमारनगर, वानवडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पोलीसांनी अद्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरात जॉर्ज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री हॉटेलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व हॉटेलमधील गल्ला उचकटून 93 हजारांची रोकड आणि आठ मोबाइल संच असा मुद्देमाल पळविला. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.