पुणे : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सय्यदनगर, हडपसर भागात हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी देहूरोड पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले आहे.
अतिक इक्बाल शेख (वय- ३७ रा. गल्ली नं. १९ ए सय्यदनगर, हडपसर, पुणे), सादीक साहील शेख (वय – २५, रा. कॉलनी नं. ०१, श्रावस्तीनगर, घोरपडी गाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी फायर केलेले पिस्टल व ८ जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट, गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर भागात फायरिंग करुन एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही हि रेकोर्डवरील पाहिजे असलेली आरोपी होते. सदर घटनेच्या अनुशंघाने वरील दोन्ही आरोपींना देहूरोड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा करताना वापरलेली देशी बनावटीची पिस्टल व तब्बल आठ काडतुसे जप्त करण्यात आलेले असुन त्यांचे मोबाईल हॅन्डसेट आणि त्यांनी गुन्हा करुन पळुन जाण्यासाठी वापरलेली बर्गमन मोटारसायकल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अतिक शेख हा पुणे शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे वर यापुर्वी त्याच्यावर खुन, मारामारी, दंगा, खुनाचा प्रयत्न अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परि. ५, पुणे शहर विक्रांत देशमुख, सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार अजय केसरकर, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, संतोष काळे, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले व मनिषा सुतार यांनी केली आहे.