Crime News : शिरूर रांजणगाव (ता. शिरूर) औद्योगीक वसाहतीमधील फियाट कंपनीमधून सायलेन्सर EURO 6 B या मधील हॅाय एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकूण १४० सायलेन्सर कट करून त्यामधून एकूण ८ लाख ४० हजार रूपये किंमतीचे पार्ट काढून कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.(Crime News)
याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी सुशांत शुक्ला यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे पुरवठा व्यवस्थापक अतिषकुमार शिवाजी कांबळे (रा. मांजरडे ता. तासगाव जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी अतिषकुमार कांबळे यांनी फियाट कंपनीमधून सायलेन्सर EURO 6 B या मधील हॅाय एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकूण १४० सायलेन्सर कट केले. आणि त्यामधून एकूण ८ लाख ४० हजार रूपये किंमतीचे पार्ट काढून कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली.(Crime News)
याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी सुशांत शुक्ला यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी अतिषकुमार कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय सरजीने करीत आहेत.