पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापकाने हॉटेलमध्ये एच आर असलेल्या २५ वर्षीय तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना मुंढवा परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय फिर्यादी या मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एच आर म्हणून काम करतात. तर आरोपी हा त्याच हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. सप्टेंबर महिन्यापासून आरोपी फिर्यादीला त्रास देत होता. फिर्यादी तरुणीला केबिनमध्ये बोलावून घेत “तू खूप सुंदर दिसते, तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे, रात्री माझ्या घरी चल आपण सेक्स करू” असे बोलू त्यांच्या जवळ जाऊन अश्लील चाळे करीत होता.
तर दुसऱ्या आरोपीने “त्याने जे काही केले ते कोणाला सांगायचे नाही, अन्यथा आम्ही तुला खल्लास करून ” अशी धमकी दिली. इतकेच नाही तर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला” आणि कोणाला काही सांगितल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसर दोन्ही आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहे.