पुणे : सासरवाडीला मटन खाण्यासाठी आलेला जावाई सासूला घेऊन पसार झाल्याची घटना राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय सासूचे लग्नाच्या आधीच २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबध होते. आपले नाते कायम टिकावे यासाठी सासूने मुलीचे लग्न या तरुणसोबत लावून दिले. आपल्या लाडक्या जावयाला जेवणाचं निमंत्रण द्यावं असं सासू-सासऱ्यांनी ठरवलं.
ठरल्यानुसार, जावई घरी आला. त्याने सासऱ्यासोबत दारूची पार्टी केली. रात्री सगळ्यांनी मटणावर ताव मारला आणि झोपी गेले. जेव्हा सासरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला घरात जावई दिसला नाही, त्याने शोध घेतला असता, बायको सुद्धा घरात दिसून आली नाही. आपली लाडकी बायको लाडक्या जावयासोबत फरार झाल्यानंतर सासऱ्याला धक्काच बसला त्याने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
दरम्यान, लग्नाच्या महिनाभरानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.