लोणी काळभोर, (पुणे): भवरापूर (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून १६ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली आहे. तर गावठी दारू बनवीत असलेल्या एका महिलेवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लताबाई अरुण राजपुत (वय- ५०, रा. गोळीबार मैदान, भवरापुर, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २५) पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, भवरापुर गावचे हददीत ओढयालगत घेतलेल्या खडयामध्ये एक महिला बेकायदेशीर गावठी हातभटटीची दारु तयार करण्याची भटटी चालवित आहे. त्या अनुशंघाने वरिष्ठाच्या आदेशानुसार सदर ठिकाणी सोमवारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी एक महिला सदर ठिकाणी खडयामध्ये गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडी काठीने ढवळत असताना दिसली. पोलीस पथकास पाहुन सदर ठिकाणावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागली असता पोलीस हवालदार भारती होले यांनी पाठलाग करून पकडले. तिला तिचे नाव व पत्ता विचारले असता वरीलप्रमाणे सांगितले.
दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या मालाची पाहणी केली असता १० हजार ५०० रुपयांचे गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे एकुण ५२५ लिटर कच्चे रसायन व ५ हजार ६०० रुपयांची गावठी हातभटटीची तयार दारु १४० लिटर असा एकुण १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उप-निरीक्षक अमोल घोडके,पोलीस हवालदार भारती होले, पोलीस नाईक अमित साळुंखे, महाविर कुटे, निखील पवार, शैलेश कुदळे, योगेश पाटील, तुकाराम पांढरे यांचे पथकाने केली आहे.