पुणे : मध्य प्रदेशातील खलघाट येथे अपघातग्रस्त बस दहा वर्षे जुनी आहे. फिटनेस सर्टिफिकेटचा कालावधीही 10 दिवसांत संपणार होता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस इंदूरहून महाराष्ट्रातील जळगावला जात होती.
या बसची नोंदणी 12 जून 2012 रोजी ग्रामीण आरटीओ, नागपूर येथे करण्यात आली. त्याच्या प्रमाणपत्राची मुदतही २७ जुलै २०२२ रोजी संपणार होती.
त्याचे पीयूसी प्रमाणपत्र आणि विमा निश्चितच वैध होता. त्या बसमध्ये चंद्रकांत एकनाथ पाटील ड्रायव्हर तर प्रकाश श्रावण चौधरी हे कंडक्टर होते. मात्र दोघांच्या मृत्यूची बातमी मिळत आहे. महामंडळाने अपघाताबाबत 022-23023940 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
कुणीही वाचले नाही :
मध्य प्रदेशातील बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान आपले पूर्वीचे विधान दुरुस्त करताना म. प्र चे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कोणीही उरलेले नाही. बसमध्ये फक्त 13-14 जण होते. अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत दोन राजस्थानचे आणि तीन महाराष्ट्रातील असल्याची पुष्टी झाली आहे. उर्वरितांची ओळख पटवली जात आहे.
मृत्यू झालेल्यांची नावे अशी –
चेतन रामगोपाल रा. जयपूर (राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी वय 70 वर्ष, मल्हारगड उदयपूर राजस्थान, प्रकाश श्रवण चौधरी वय 40 वर्ष, अमळनेर जळगाव महाराष्ट्र (वाहक), चंद्रकांत एकनाथ पाटील वय 45 वर्ष, रा. अमळनेर जळगाव (चालक), निंबाजी आनंदा पाटील वय 60 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव, कमलाबाई निबाजी पाटील, वय 55 वर्ष, पिळोदा अमळनेर जळगाव, श्रीमती अरवा मुर्तजा बोरा, य 27 वर्ष, मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्र, सैफुद्दीन अब्बास नूरानी नगर इंदूर)
मोटारसायकल वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असेही मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये आठ पुरुष, चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. त्याची ओळख पटू शकली नाही.
पंतप्रधान कार्यालयाकडून मदत
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले की, मध्य प्रदेशातील धार येथे झालेला बस अपघात दुःखद आहे. बस दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. मदतकार्य सुरू असून स्थानिक प्रशासकीय अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर, जखमींना 50,000 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.