पुणे : वडिलांनी १३ वर्षीय मुलीची हत्या केली, त्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता .९) रोजी घडली आहे. याप्रकरणी खून झालेल्या मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी १३ वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कॅनॉल मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही.