जबलपूर : ५० प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जबलपूर (मध्य प्रदेश) येथे नुकतीच घडली आहे. हृदयविकाराचा झटका येऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने ६ जणांना चिरडले आहे.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस चालवताना मेट्रो बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा बसवरील ताबा सुटला. या अपघातात मेट्रो बसने ई-रिक्षा, ऑटो रिक्षा आणि दुचाकी चालकांनाही धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सुरुवातीला लोकांना वाटलं की मेट्रो बस ड्रायव्हर मद्यधुंद आहे, पण जेव्हा लोकांना मेट्रो बस ड्रायव्हर बेशुद्धावस्थेत आढळला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. बस चालकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कारण साधारणपणे थंडीच्या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेट्रो बस चालकाला सकाळी अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येणे ही खरोखरच धक्कादायक घटना आहे. हा अपघात यापेक्षाही भयानक होऊ शकत होता, मात्र सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला थांबली.