पुणे – पुण्यातील एका हॉटेलमध्ये बिहारमधील एका महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) रोजी उघडकीस आली आहे.
कविता कुमारी असे मृतदेह आढळलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता कुमारी या एका प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांच्या पथकासह पुण्याला आल्या होत्या. टीमसोबत त्या पुण्यातील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. त्यांतर ते आराम करण्यासाठी आपल्या हॉटेलच्या रुममध्ये गेल्या. मात्र, त्यांतर त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, कविता कुमारी हे कोइलवार नगर वॉर्ड क्र. 3 मधील रहिवासी बिराज कुमार यांच्या कन्या होत्या. त्यांची पोस्टिंग मुझफ्फरपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरा पोलीस ठाण्यात होती. कविता यांची आई माया देवी या पूर्वी प्रभाग 5 च्या नगरसेविका होत्या. कविता यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याने त्यांच्या परिसरात शोककळा पसरली आहे.
कविता कुमारी यांचा मृतदेह हॉटेलमधील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, याठिकाणी कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे अद्यापही कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.