Pune Crime : पुणे : जनरेटरची चोरी करणाऱ्या तीन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वेल्हा तालुक्यातील खरीव येथून या चोरट्यांनी जनरेटरची चोरी केली होती. यावेळी जनरेटर व रिक्षा असा एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. (Pune Crime) गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेगाव पठार परिसरातून या भामट्यांना ताब्यात घेतले आहे. (The Crime Branch arrested three criminals who stole generators)
जनरेटर व रिक्षा असा एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त
शैलेश चंद्रकांत निवगुणे (वय २१, रा आंबी. ता हवेली), सागर शिवाजी भोसले (वय – 20, रा. लशिरगांव, वेल्हा), सुमित परशुराम गजले (वय – 21, रा. दापोडे, ता. वेल्हा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. वेल्हा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील खरीव येथे रिक्षामधून चोरीचे जनरेटर घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली. (Pune Crime) दरम्यान गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते तेव्हा त्यांना या चोरीसंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर पथकाने सापळा लावला व आंबेगाव पठारमधील दत्तनगर परिसरात रिक्षा अडवली. (Pune Crime) रिक्षामध्ये पाहणी करता एक लाल रंगाचा जनरेटर आढळून आला. याविषयी पोलीसांनी चौकशी केली असता 15 दिवसांपूर्वी वेल्ह्यातील खरीव गावातून जनरेटर चोरी केल्याचे आरोपीने कबूल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
pune crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना