Pimpari Crime : पिंपरी, (पुणे) : येथे बस का थांबवतात असे बोलून वाहनचालकाने (driver abusing) शिवीगाळ करत पीएमपी (PMP) बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याचा धक्कादायक (happened) प्रकार समोर आहे. तरुणाने मारहाण करत तुला दाखवतो अशी धमकीही दिली. निगडी बस स्टँड (Nigdi Bus Stand) येथे बुधवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. Pimpari Crime News
चारचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा
प्रशांत विनायक देवरे (वय ३३, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवरे हे पीएमपीएमएल बसचे कंडक्टर आहेत. फिर्यादी हे बुधवारी कर्तव्यावर होते. निगडी – भोसरी बसमध्ये कंडक्टर म्हणून फिर्यादी कर्तव्यावर असताना आरोपी वाहनचालक तेथे आला. ए येथे बस का थांबवतात, असे बोलून आरोपीने शिवीगाळ केली. मी डेपो मॅनेजर नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर डेपो मॅनेजरला भेटा, असे फिर्यादीने सांगितले.
दरम्यान, याचा राग मनात धरून आरोपीने बसमध्ये येऊन फिर्यादीची काॅलर पकडून फिर्यादीला बसमधून खाली ओढून घेतले. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला दाखवतो, अशी धमकीही आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.